Sponsor

रेहेकुरी यात्रा उत्सव 2022: कर्जत तालुक्यातील रेहेकुरी यात्रे विषयी माहिती

Rehekuri yatra: कर्जत तालुक्यात पासून काळवीट अभयारण्य अशा माध्यमातून तुम्ही ऐकलेच असेल पण या रेहेकुरी गावामध्ये एक प्रकारची यात्रा सुद्धा भरते तसेच हे गाव एक जंगलमय भागात असून या गावाचा भाग हा बराचसा प्रमाणात जंगलांमध्ये व्यापलेला आहे तसेच या गावातील यात्रा मोठ्या स्वरूपात केली जाते. या गावातील जागृत देवस्थान म्हसोबा या देवाची यात्रा असते.  
यात्रा अक्षय तृतीया होऊन जो रविवारी येत असतो त्या रविवारी ही रेहकुरी गावाची यात्रा असते. म्हसोबा हे अनेक लोकांचे श्रद्धास्थान सुद्धा आहे तसेच खूप लांबून या यात्रेसाठी भाविक येत असतात. बाहेरून किंवा आपल्या गावातील असे बरेच लोक हे आपल्या श्रद्धेने नवस सुद्धा बोलतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण सुद्धा होतात. त्यामुळे आपला नवस या ठिकाणी येऊन फेडत असतात. काही लोक देवाला घोडा किंवा शेरनी किंवा बोकड कापून आपला नवस फेडत असतात.

या गावातील म्हसोबा या मंदिराच्या आसपास काही नव्हते अत्यंत डोंगराळ भागात असल्यासारखे होते. परंतु आता गावकऱ्यांच्या माध्यमातून या परिसरात बरेच सुशोभीकरण करण्यात आलेले आहे. यात्रेला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे गावात हे अनेक बाहेरून आपली उपजीविका करणारे लोक या ठिकाणी येत असतात पाळणे असतील किंवा खेळणी विकणारी दुकाने असतील खाण्याची दुकाने असतील. अशा बऱ्याच प्रकारची दुकाने या ठिकाणी येत असतात. त्यामुळे यात्रा ही अत्यंत चांगल्या प्रकारे साजरी होत असते.

यात्रे मध्ये रात्री देवाचा छबिना निघतो त्यानंतर यात्रेनिमित्त गावात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा असतात. यात्रा ही प्रामुख्याने दोन दिवस चालत असते आणि दुसऱ्या दिवशी कुस्तीपटूंन साठी हगामा ठेवलेला असतो या हगाम्यामध्ये अनेक कुस्तीपटू येथे येऊन आपली कुस्ती खेळत असतात आणि सर्व गावकरी ही आपली यात्रा आनंदाने साजरी करतात.

Post a Comment

0 Comments