Ramzan Eid: मुस्लिम बांधवांचे महत्त्वाचे दोन सण म्हणजे ईद-उल-फितर आणि ईदुज्जह. यातला ईद-उल-फितर हा आनंदाने साजरा करणारा मोठा सण आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात चंद्र दर्शन होईपर्यंत रोज उपवास केले जातात.
सूर्य उगवण्यापूर्वी अन्नाच ग्रहण करायचे आणि नंतर संपूर्ण दिवस सूर्यास्त होईपर्यंत उपवास पाळायचं सूर्यास्त झाल्यानंतर नमाज करून प्रार्थना करावयाची आणि उपवास सोडयचा. असा हा नियम संपूर्ण महिनाभर पाळायचा या पवित्र दिवसांमध्ये कुरान शरीफ ग्रंथांचे वाचन करायचे वाचन केल्यानंतर चिंतन-मनन केली जावे असा नियम आहे. Ramzan Eid mahiti Marathi
मुस्लिम कॅलेंडर मध्ये चंद्र दर्शनाला महत्त्व असून चंद्र दर्शन झाल्यावर रमजान ईद संपूर्ण जगभरात साजरी केली जात असते. 3 मे 2022 रोजी ईद-उल-फितर म्हणजेच रमजान ईद साजरी होणार असे सांगितले जात आहे. ईद निमित्त खाद्यपदार्थाची रेलचेल असते. दूध, सुकामेवा आणि शेवया यापासून बनवलेल्या शिर खुरमा चे विशेष महत्त्व रमजान ईद दिवशी असते.
रमजान ईद माहिती मराठी | Ramzan Eid information in Marathi
रमजान ईद दिवशी गळा भेटीला विशेष महत्त्व दिले जाते तसेच मुस्लीम बांधव यंदा उत्साहात साजरी करणार असून नमाज पठण केले जाईल चला तर मग आपणही आपल्या मुस्लिम बांधवांना ईद निमित्त मराठीतून शुभेच्छा देऊया.
0 Comments