Sponsor

तंबाखू सेवन किती धोकादायक आहे यासाठी ही माहिती तुम्ही नक्की वाचाच

Tobacco: तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे की भारत हा एक विकसनशील देश आहे आणि जगाच्या पाठीवर भारत प्रत्येक गोष्टीत आता अग्रेसर बनवत आहे तर सर्वात जास्त तरुण वर्ग भारतात आहे पण हाच तरुण वर्ग आज व्यसनाच्या विळख्यात अडकलेला लागलेला आहे. जगात तंबाखूचे उत्पादन घेण्यास चीन नंतर दुसरा क्रमांक भारताचा लागतो.
कारण तुम्ही तर पाहतच असाल की आपल्या देशात तंबाखू सेवन करणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे. युवा पिढी व्यसनाने अखंड बुडलेली आहे व या व्यसनात मशगुल झालेली आहे ही खूप मोठी शोकांतिका आपल्यासाठी आहे. 

तंबाखूमुळे कॅन्सर कर्करोग होऊ शकतो 
तंबाखूच्या सेवनामुळे तोंडाचा, पोटाचा, किडनीचा, मुत्रा शयाचा इत्यादी कॅन्सर / कर्करोग होऊ शकतात.

तंबाखूमुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या विकार
तंबाखूमुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या विकार, हृदयरोग, छातीत दुखणे, हृदयविकाराच्या झटक्यामुळे अचानक मरण येणे, स्ट्रोक, परिधिय सवहनी हे रोग होतात.

तंबाखूचे सेवन अचानक रक्तदाब वाढविते आणि हृदयाकडे जाणारा रक्तपुरवठा कमी करते.

तंबाखू संपूर्ण शरीराच्या धमन्यांच्या पापुद्र्याला नुकसान पोहोचवते.

तंबाखू आणि धूम्रपानामुळे मधुमेह होण्याची शक्यता जास्त बळावते.

तंबाखूमुळे रक्तातील चांगले कोलॅस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते.

तंबाखूचे सेवन शारीरिक ताकद कमी करते आणि त्यामुळे सहनशीलता ढासळते.

Post a Comment

0 Comments